स्पर्धेविषयी

सकाळ चित्रकला
स्पर्धा २०२४

राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ येत्या २१ जानेवारीला

शालेय मुलांबरोबरच कॉलेजियन्स, दिव्यांग विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरीकांनाही सहभागाची संधी....

सप्रेम नमस्कार,

The state-wide ‘Sakal – Drawing Competition – 2024’, which has been organized since 1985 by the ‘Sakal Medium Group’ for the school students of Maharashtra, state will be held this year on Sunday (January 21). ‘Sakal – Painting Competition’ is widely known as a competition which is organized simultaneously in the entire state on the same day. This competition has been held continuously for the last 38 years and this year is the 39th year of the competition. This competition was conducted online even during Corona.

आतापर्यंत करोडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी प्रतिव्यक्ती रु ५०/- शुल्क आहे. सोबत नोंदणी साठी QR कोड व लिंक दिली आहे. ही स्पर्धा एकूण सहा गटांत घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाईन) होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात असेल.

स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाईन) सहभागी होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे दिला जाईल. स्पर्धेचे नियम, स्पर्धा केंद्रांचे तपशील, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, जेष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या ऑनलाईन स्पर्धेचे स्वरूप दैनिक ‘सकाळ’मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल व या chitrakala.sakalnie.in संकेत स्थळावर उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सोबत नोंदणीसाठी QR कोड व लिंक दिली आहे.

गरजू विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष संधी... राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरातील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्सॲप क्रमांकावर विद्यार्थ्यांची नोंदणी करावी. ८६०५०१७३६६/९९२२४१९१५०

पालकांना व आजी-आजोबांना सुवर्णसंधी ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३९वे वर्ष असून, तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५पासून भाग घेतलेल्या, मात्र आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची 'सकाळ -चित्रकला स्पर्धा २०२३' सु वर्णसंधी आहे. या स्पर्धेत पालक व आजी-आजोबा देखील सहभागी होऊ शकतात.

धन्यवाद

मृणाल पवार

संचालिका, सकाळ माध्यम समूह

  1. कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमाचे बंधन नाही. चित्र कोणत्याही रंगसाहित्याने रंगवावे
  2. स्पर्धेचा निकाल मे २०२४ मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ‘सकाळ’मधून जाहीर केला जाईल.
  3. त्यानंतर टप्प्या टप्प्याने राज्य पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात येईल.
  4. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन युवक - युवतींना व पालकांना प्रतिव्यक्ती रु ५०/- शुल्क आहे. सोबत नोंदणी साठी QR कोड व लिंक दिली आहे.
    The fee is Rs.50/-. A QR code and link is provided for registration.
  5. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी रु ५०/- शुल्क भरून नोंदणी केल्याचा मेसेज आणि स्पर्धकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  6. गट अ ते ड साठी स्पर्धा प्रत्यक्ष केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल, तर गट ई आणि फ यांची परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीनेच होईल.